Maharashtra : या जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ डिसेंबर । चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहेत. त्यामुळे भारतातही खबरदारी घेण्यात येत आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. देशात परदेशातून आलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (One corona patient positive in Ratnagiri) आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी खास सूचना दिल्या आहेत.

मंडणगड तालुक्यात पाल्ये गावतील एका रुग्णाची अँटिजिन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अलर्टमोडवर आहे. जरी कोरोनाचा रुग्ण सापडला असला तरी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. परंतु काळजी घेणे आवश्यक आहे. या संशयित रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात आली आहे, अशी अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभाग सतर्क
जगात कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीन आणि जपानमध्ये कोरोना पुन्हा उद्रेक पाहायला मिळत आहे. आता देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्लीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. देशात काही राज्यांत कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने सरकारने निर्बंधाबाबत आदेश लागू केलेत. महाराष्ट्रातही कोरोना हळूहळू हातपाय पसरु लागला आहे. गेले चार पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नव्हता, परंतु मंडणगड तालुक्यात कोरोनाचा एक रुग्ण सापडला. या रुग्णावर दापोली येथील उप जिल्ह्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हयात मोठे रुग्णालय असलेल्या चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात कोरोनाबाबत खबरदारीचा उपाय घेण्यात येत आहे. याठिकाणी आता मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच नवीन वर्षाचे स्वागतासाठी जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

राज्य सरकारकडून खबरदारी
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अलर्ट केलेआहे. राज्य पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आले आहे. टेस्टिंग आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय परदेशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच तालुका पातळीपासून ते महानगर पालिकेतील सर्व आरोग्य यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *