महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ डिसेंबर । एनआयएने गुरुवारी पहाटे केरळमध्ये मोठी कारवाई केली. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना लक्ष्य करत एनआयएने पीएफआयच्या 56 ठिकाणांवर छापे टाकले. . एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, छापे टाकण्यात आले आहेत .
पीएफआय संघटनेला दुसऱ्या नावाने पुन्हा संघटित करण्याची त्यांच्या नेत्यांची योजना होती. हेच लक्षात घेत केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चारच्या सुमारास ही छापेमारी सुरू झाली. केरळच्या एर्नाकुलममध्ये पीएफआयच्या नेत्यांशी संबंधित आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत, तर तिरुअनंतपुरममधील सहा ठिकाणं एनआयएच्या रडारवर आहेत.