तयारी लोकसभेची:प्रचाराचा औरंगाबादेत फोडणार नारळ; शिवसेनेच्या 12 जागांवरही भाजपचा दावा ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ डिसेंबर । महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये शिवसेनेने लढवलेल्या २३ जागांपैकी १२ जागांवर दावा करत एकूण ४० जागा यंदा लढवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. नव्या समीकरणात शिंदेसेनेच्या वाट्याला फक्त ८ जागा येण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासून सेनेकडे असलेला औरंगाबादचा मतदारसंघही भाजप लढवणार असल्याने इथूनच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची रणनिती भाजपने आखली आहे. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत २ जानेवारी रोजी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे.

मित्रपक्ष सोडून गेल्यानंतर राहिलेल्या एकूण २१२ लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. पंजाबमध्ये अकाली दल, बिहारमध्ये जनता दल आणि महाराष्ट्रात एकत्रित शिवसेनेची पोकळी भरून काढण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

सेनेच्या या जागांवर नजर औरंगाबाद, बुलडाणा, रामटेक, हिंगोली, परभणी, पालघर, ठाणे, शिर्डी, उस्मानाबाद, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबई दक्षिण या सेनेकडील जागांवर भाजपची नजर आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील रायगड, शिरूर आणि साताऱ्यासाठी तयारी सुरू केली आहे.

केंद्रीय मंत्र्यांवर जबाबदारी जून २०२२ मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला एकनाथ शिंदेंनी आव्हान दिले. शिवसेनेच्या १८ मधील १२ खासदार शिंदेंच्या नेतृत्वात दाखल झाले. या पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभेची तयारी सुरू केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *