![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ जानेवारी २०२३ । शौर्य दिनानिमित्त (Shaurya Din) कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. आज दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सकाळी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. तर मंत्री चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत.
कोरेगाव इथे 1 जानेवारी 1818 मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधण्यात आला. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकर अनुयायी यांच्यासह इतरही लाखोंच्या संख्येनं लोक या ठिकाणी येतात.