महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ जानेवारी । रविवारी पहाटे राजधानी दिल्लीला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. नववर्षाच्या स्वागतात लोक रमलेले असताना कारमधून जाणाऱ्या पाच तरुणांनी एका तरुणीला चार किमीपर्यंत फरफटत नेले. यामध्ये या तरुणीचा मृत्यू झाला आहे.
ही घटना एवढी धक्कादायक होती की रस्त्यावरून घासत घासत नेल्याने तरुणीच्या मृतदेहाची चाळण झाली होती. एका तरुणाने हा प्रकार पाहिला आणि पोलिसांना याची फोनवरून माहिती देत राहिला, परंतू पोलीसही एवढे निर्ढावलेले की माहिती मिळूनही घटनास्थळी आले नाहीत. प्रत्यक्षदर्शी दीपकने हा दावा केला आहे.