Indian Railways: IRCTC चा नवा नियम, ‘या’ प्रवाशांना मिळणार रेल्वेचे मोफत जेवण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ जानेवारी । हिवाळा हंगाम सुरू आहे. यामुळे वातावरणात अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील बहुतांश भागात धुक्याची समस्याही कायम आहे. परिणामी दाट धुक्यांमुळे दृष्यमानता कमी झाल्याने अनेकदा ट्रेनला नियोजित स्थळी पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा उशीर झाल्यामुळे लोकांची फ्लाइट चुकते. अशा परिस्थितीत, भारतीय रेल्वेने एक विशेष सुविधा आणली आहे. जेव्हा ट्रेनला (train) नियमित वेळेत रेल्वे स्थानकात पोहचण्यास शक्य झाले नाही तर रेल्वेकडून प्रवाशांना (free food) मोफत जेवण देण्यात येणार आहे. तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता? चला जाणून घेऊया.

तुम्हाला या योजनेबद्दल माहिती आहे का?
रेल्वेकडून प्रवाशांना अनेक सुविधा मोफत दिल्या जातात. बहुतांश लोकांना या सुविधांची माहिती नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला ही गोष्ट माहित असणे आवश्यक आहे. जर तुमची ट्रेन उशीरा धावत असेल किंवा कोणत्याही कारणाने उशीर झाली तर भारतीय रेल्वे प्रवाशांना विशेष सुविधा देते.

याचा लाभ प्रवाशांना मिळतो
रेल्वेच्या नियमांनुसार (Indian Railway) ट्रेनला दोन तास किंवा त्याहून अधिक उशीर झाल्यास प्रवाशांना नाश्ता आणि जेवण मोफत दिले जाते. काही निवडक एक्स्प्रेस गाड्यांमध्येच ही सुविधा उपलब्ध आहे. या गाड्यांमध्ये राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेसचा समावेश आहे. हिवाळ्यात धुक्यामुळे अनेक वेळा गाड्या तासनतास उशिराने धावतात. अशा परिस्थितीत, जर तुमची ट्रेन देखील उशीर होत असेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घ्यावा. तसे, जर ट्रेन लेट असेल तर IRCTC प्रवाशांना ही सुविधा देते, पण जर जेवण तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर तुम्ही IRCTC कडे या सुविधेची मागणी करू शकता.

या गोष्टी अन्नामध्ये उपलब्ध असणार
रेल्वे नाश्त्यासाठी चहा किंवा कॉफी आणि बिस्किटे पुरवते. त्याच बरोबर संध्याकाळच्या नाश्त्यात चहा किंवा कॉफी आणि बटर चिपलेट, चार ब्रेड दिले जातात. दुपारी जेवणाच्या वेळी डाळ, रोटी आणि भाजी दिली जाते. कधी कधी दुपारच्या जेवणातही पुरी दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *