महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ जानेवारी ।
मेष (Aries)
भविष्यात चिंतेचं कारण ठरू शकेल, अशा आर्थिक व्यवहारांकडे पाहण्याचा आजचा दिवस आहे. तुम्ही काही गोष्टी पुढे ढकलत आहात; पण त्या लवकरच कक्षेबाहेर जाणार आहेत. नजीकच्या भूतकाळात ओळख झालेली एखादी व्यक्ती मदत मागण्याचा प्रयत्न करू शकते.
वृषभ (Taurus)
आजचा दिवस सरप्राइझेसचा असेल. तुमचे वरिष्ठ काय सल्ला देऊ इच्छितात याकडे दुर्लक्ष न करण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस स्वतःसाठी काही वेळ काढण्याचा आणि स्वतःचे लाड करून घेण्याचा आहे.
मिथुन (Gemini)
तुमच्या संयमाचं फळ तुमच्या अपेक्षेपेक्षा लवकरच तुम्हाला मिळेल. तुम्ही भूतकाळात काही अडचणी सोसल्या असतील, तर तुम्हाला लवकरच एखादा कौन्सेलर भेटण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले लागतील.
कर्क (Cancer)
एखादा विश्वासू माणूस तुमच्याकडे मदत मागण्याची शक्यता आहे. कॅश इन्फ्लो अर्थात पैशांचा प्रवाह आश्वासक वाटायला सुरुवात होईल. लवकरच एखादा रिनोव्हेशन प्रोजेक्ट हाती घेण्याचा विचार असेल, तर तो पुढे ढकलावा.
सिंह (Leo)
आजच्या दिवसात तुमच्या चेहऱ्यावर हसू खुलण्यासारख्या अनेक गोष्टी घडतील. तुमचे आई-वडील तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा करत आहेत. त्यावर चांगली, यशस्वी चर्चा होईल. हरवलेली एखादी गोष्ट आता सापडेल. आजचा दिवस खूपच दमवणारा असेल.
कन्या (Virgo)
गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या महत्त्वाच्या गोष्टीची वाट पाहत आहात, ती आता घडण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराकडून आलेली बातमी तुम्हाला नवा उत्साह देऊन जाईल. प्रायव्हसीचा भंग झाल्यामुळे साधं-सरळ डेली रूटीन विस्कळीत होईल.
तूळ (Libra)
लवकरच सेलिब्रेशन्स होणार आहेत. एखादी गोष्ट अनियोजित पद्धतीने घडत असेल, तर त्याला एखादी चंदेरी किनार असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. महत्त्वाचे निर्णय घाई-गडबडीत घेऊ नका. त्याचे काही पडसाद उमटू शकतात.
वृश्चिक (Scorpio)
तुमच्या अति प्रॅक्टिकल असण्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली जाऊ शकते. तुम्हाला व्यक्त होण्याच्या कौशल्यावर काम करावं लागण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असेल, तर त्या सगळ्या पूर्णपणे सांगितल्या जातील असं नाही. तुम्ही एवढ्यातच एक्साइट होऊ नका. एक्साइटमेंट तात्पुरत्या स्वरूपात राखून ठेवा.
धनू (Sagittarius)
आजचा दिवस तुम्हाला हवा असेल तसा असेल. खूप जास्त काम करण्याच्या नादात मनावर खूप ताण देऊ नका. काम पूर्ण करणं किंवा ते बाजूला ठेवून बसणं यांपैकी काहीही तुम्ही निवडू शकता. आजचा दिवस तुमच्या ऊर्जेचं नूतनीकरण करण्याचा आहे.
मकर (Capricorn)
माहिती नसलेल्या एखाद्या ठिकाणाकडे जाण्याचा प्रवास करण्याचं नियोजन तुम्ही करत असलात, तर तुम्हाला ते उपयुक्त ठरू शकेल. तुमचं ज्येष्ठ चुलत/मामे भावंड किंवा एखादा नातेवाईक तुमची खूप आठवण काढेल. तुम्ही ट्रेडिंगमध्ये असलात, तर आजचा दिवस Buy & Sell साठी चांगला आहे.
कुंभ (Aquarius)
तुमच्या निर्णयावर आग्रही न राहण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठ सूक्ष्मपणे तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुमच्याकडे अतिरिक्त जबाबदारी येईल. स्पष्टपणे व्यक्त व्हा.
मीन (Pisces)
आजचा दिवस पुढचं प्लॅनिंग करण्याचा आहे. पुढे विस्तारीकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कौशल्यं शिकण्यासाठी सज्ज व्हा. उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करत असल्याचं तुमच्या लक्षात येईल. विश्वासू मित्राकडून सल्ला घेणं चांगलं.