महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।लक्ष्मण रोकडे । ५ जानेवारी । पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. स्वारगेट, पुणे अंतर्गत बी. आर. टी करारनाम्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित सुरक्षा रक्षक पुरवठादार कंपनी (ॲक्टिव्ह प्रोटेक्शन सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड) अधिकारी व पी.एम.पी.एल. पुणे यांचे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शासनाची व कामगारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिस आयूक्त पिंपरी -चिंचवड यांना निवेदन दिले.
आपणांस संघटनेतर्फे विनंती करण्यात येते की, उपरोक्त विषयान्वये पी.एम.पी.एम.एल. पुणे (पिंपरी-चिंचवड व पुणे म.न.पा. शासकीय वाहतुक संस्था) यांच्या अंतर्गत बी.आर.टी बस थांबा आहे. सदर बस थांब्याच्या सुरक्षितेकरिता सदर संस्थेने ॲक्टिव्ह प्रोटेक्शन सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरवठादार कंपनीस कंत्राट दिलेले आहे. सदर कंत्राट हे ३ वर्षाचे आहे कालावधी माहे एप्रिल सन २०२१ ते सन २०२४ या संदर्भात पी.एम.पी.एल. पुणे व सदर ॲक्टिव्ह प्रोटेक्शन कंपनी यांचे मध्ये तशा प्रकारचा शासकीय नियम व अटी याच्या अधीन असलेला करारनामा झालेला आहे.
करारनाम्यानुसार सदर ॲक्टिव्ह कंपनीने शासनाचे कामगार कायदे विषयक असलेले सर्व नियम व अटी याचे पालन न करता कामगारांन विषयक असलेल्या सर्व सवलती, हक्क, किमान वेतन कामगार कायदा याची योग्य अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन दिलेले आहे. असे असताना सदर ॲक्टिव्ह कंपनीने कामगाराचे सर्व कामगार कायदे पायदळी तुडवून कामगारांचे हक्क, सुरक्षा वेतन, बोनस, साप्ताहित रजा, इतर बाबत कामगाराची घोर फसवणूक केली. तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच देऊन पी.एम.पी.एल. पुणे या शासकीय संस्थेची खोटी अवाजवी रक्कम उकळलेली आहे. यामध्ये कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे असे संघटनेच्या निदर्शनास आलेले आहे.