लॉकडाउन मध्ये देशात इंटरनेटचा वापर इतक्या टक्क्यांनी वाढला;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – भारतामध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, सोशल मिडिया, किराणामालाची सेवा देणारे अ‍ॅप आणि वेबसाईट तसेच शैक्षणिक वेबसाईटचा वापर फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यादरम्यान वाढल्याची माहिती समोर आली आहे. या कालावधीमध्ये लॉकडाउनमुळे अनेकजण घरीच बसून असल्याने इंटरनेटच्या वापरात वाढ झाल्याचे कालागॅटो प्रायव्हेट लिमिटेड या डेटा रिसर्च फर्मने जारी केलेल्या अहवालामध्ये म्हटलं असल्याचे वृत्त ‘द मिंट’ने दिलं आहे. तर भारतामध्ये इंटरनेट सेवा पुरवणारी सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या एसीटी फायबरनेटने जारी केलेल्या अहवालानुसार भारतामधील
इंटरनेटचा वापर ४० टक्क्यांनी वाढला आहे.

यांना झाला फायदा; हायपरलोकल डिलेव्हरी करणाऱ्या डॅन्झो, स्वीगी आणि झोमॅटोसारख्या कंपन्यांनी अनेक ऑफलाइन दुकानदार, सुपरमार्केट आणि कस्टमर पकेज्ड गुड्स विकणाऱ्या ब्रॅण्डशी करार करुन लॉकडाउनच्या कालावधीमध्ये सामान पुरवठा करण्यावर भर दिल्याचे पहायला मिळालं. स्थानिक दुकानदार आणि निर्मात्यांशी करार केल्याने लॉकडाउनच्या कालावधीमध्ये या हायपर लोकल डिलेव्हरी सेवा देणाऱ्या या कंपन्यांना एक दिवसात वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचवणे शक्य झाले. ऑनलाइनच्या माध्यमातून किराणामालाची विक्री करणाऱ्या बिग बास्केट, प्राइम नाव, ग्लोफर्स यासारख्या सेवांना त्यांच्याकडील यादीवर आधारित रचनेमुळे मोठा फटका बसला. अनेक ग्राहकांना आपली ऑर्डर देण्यासाठी अनेक दिवस वाट पहावी लागत असल्याचा अनुभव आला.

यांना झाला तोटा; फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसारख्या इ कॉमर्स साइटवरील दैनंदिन युझर्सची संख्या ५० टक्क्यांनी कमी झाली. याच कालावधीमध्ये ऑनलाइन किराणामाल विक्री करणाऱ्या बिग बास्केट, फ्रेश टू होम आणि डिमार्टसारख्या सेवांचा वापर करणाऱ्या युझर्सची संख्या ५० टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

शैक्षणिक सेवा पुरवण्यांची मागणी वाढली; ऑनलाइन लर्निंग म्हणजेच अभ्यासासंदर्भातील प्लॅटफॉर्मवरील युझर्सची संख्याही वाढच्याचे दिसून आलं आहे. गणिताचे धडे देणाऱ्या टॉपर्सवरील युझर्सची संख्या ४७ टक्क्यांनी वाढली आहे. तर बायजू या लोकप्रिय सेवेचा वापर करणाऱ्या युझर्सची संख्या ४३ टक्क्यांनी वाढली आहे. या सेवेच्या माध्यमातून सेशन्स पाहण्याची आकडेवारी १०६ टक्क्यांनी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *