महाराष्ट्र २४- ऑनलाईन – बुलढाणा – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने मार्फ़त पात्र रेशन कार्ड धारकाने नियमितपणे स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर कार्ड धारकाला एक किलो हरभरा किंवा तुरदाळ मोफत देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली यासाठी केंद्राने महाराष्ट्र राज्याला प्रति माह सोळा हजार मेट्रिक टन डाळ उपलब्ध करून देण्यात आली राज्यातील सात कोटी कार्डधारकांना याचा फायदा होणार असे जाहीर करण्यात आले राज्यातील काही जिल्ह्यात डाळीचे वाटप करण्यात आले, मात्र बुलढाणा जिल्ह्यातील एकाही गोदामात तूर हरभरा डाळ उपलब्ध नाही.तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमार्फत माहे एप्रिल,मे,जून 2020 या तीन महिन्यासाठी नियमित धान्या सोबत एक किलो हरभरा किंवा तुरदाळ मोफत देणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
परंतु बुलढाणा जिल्ह्यात एकाही गोदामात डाळींचा साठा उपलब्ध नसल्याने डाळ वितरण रखडल्याचे चित्र आहे, तरी बुलढाणा जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे.असे आवाहन राजेश आंबूस्कार ,( जिल्हा अध्यक्ष,बुलडाणा जिल्हा स्वस्त धान्य संघटना) यांनी केले .