महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ जानेवारी ।विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या संभाजी महाराज धर्मवीर नाहीत या वक्तव्यावरुन राज्यात सध्या बरेच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच अजित पवारांनी काल (4 डिसेंबर) पुन्हा एकदा आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं म्हटलं पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे.
यावेळी अजित पवारांना आमदार नितेश राणेंनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आले. तेव्हा अजित पवारांनी त्या टिल्ल्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांची खिल्ली उडवली. त्यावर आता नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही.@AjitPawarSpeaks
— nitesh rane (@NiteshNRane) January 5, 2023
उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली आणि हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टीका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही” अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे. ट्विट करत त्यांनी ही टीका केली आहे.