महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ जानेवारी । 2022 मध्ये कोरोनामुळे लाखो कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या. गेल्या वर्षभरात Amazon, Netflix आणि Facebook सारख्या मोठ्या कंपन्यांनी नोकऱ्यांमध्ये मोठी कपात केली होती.काही कंपन्यांनी नोकऱ्यांच्या कपातीसाठी कोरोनाचे कारण दिले. तज्ज्ञांच्या मते, 2023 मध्ये मागील वर्षांच्या तुलनेत नोकऱ्यांना अधिक धोका आहे.विविध कंपन्यांमधील कर्मचारी कपातीवर लक्ष ठेवणाऱ्या एका वेबसाइटने (https://layoffs.fyi/) गेल्या काही वर्षांची आकडेवारी सादर केली आहे जी अतिशय धक्कादायक आहे.
layoffs.fyi वेबसाइटनुसार, गेल्या वर्षी 2022 मध्ये, 1,53,000 हून अधिक नोकऱ्यांवर गदा आली. हा आकडा फक्त टेक कंपन्यांचा आहे. तर 2021 मध्ये 15,000 नोकरी कपात दिसली आणि 2020 मध्ये हा आकडा 80,000 च्या आसपास होता.तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये अधिक नोकरी कपात दिसून येईल. गुगल या महिन्यात हजारो लोकांच्या नोकऱ्याही काढून टाकू शकते. अॅमेझॉनबाबत तज्ज्ञांचेही असेच मत आहे की, या वर्षीच्या जानेवारीत अॅमेझॉन अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकते.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गोल्डमन सॅक्सचे सीईओ डेव्हिड सोलोमन यांनीही कर्मचारी कापतीकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट दिसून येऊ शकते.2023 मध्ये अमेरिकेसह संपूर्ण जग मंदीच्या गर्तेत आहे. अशा परिस्थितीत 2022 सालापासूनच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली होती.यामध्ये ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, फेसबुकची मूळ कंपनी मेटा अशा अनेक बड्या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.