महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ जानेवारी । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे शिवसेना अख्खी रिकामी झाली आहे. या बंडामुळे दोन पक्ष तयार झाले असून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वेगळी झाली आहे. मात्र अनेक नेते बाहेर पडल्यामुळे उद्धव ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. अशा परिस्थितीत मुंबई विद्यापीठांची सिनेट निवडणूक आली असून या निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे जुळवा-जुळव करत आहेत. मात्र त्यांना या निवडणुकीत चुलत भाऊ अमित ठाकरे यांचा थेट सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे मतांचे गणित बसवण्यात व्यस्त आहेत. (Aditya Thackeray news in Marathi)
मनसेच्या नितीन सरदेसाई यांचे पुत्र यश सरदेसाई यांनी शिंदे गटाच्या पूर्वेश सरानाईक यांची भेट घेतली आहे. मागील १० वर्षापासून मुंबई विद्यापीटाच्या सिनेटवर वर्चस्व आहे. मात्र या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी अमित ठाकरे सरसावले आहेत.
दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी सिनेट निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या निवडणुकीत शिंदे गट, मनसे आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेविरुद्ध शिंदे गट, मनसे आणि भाजप यांच्यात लढत होणार आहे.