महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ जानेवारी । भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.
दरम्यान, आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरी जावून घरच्यांची सांत्वनपर भेट घेतली. अजित पवार यांनी मुलांची आणि जगताप यांच्या भावांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला.
जगताप हे राष्ट्रवादीचे तसेच अजित पवार यांचे खंदे मानले जात होते. पक्षाच्या माध्यमातून लक्ष्मण जगताप यांना अनेक मोठी पदं दिली. यावेळी अजित पवार यांनी २००४ सालच्या विधान परिषद निवडणुकीचा किस्सा सांगितला. ते म्हणाले कि “२००४ च्या निवडणुकीवेळी चिंचवडची जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती.
मात्र या परिसरात राष्ट्रवादीच्या विचाराची मतं मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे मला त्या ठिकाणाहून आमच्या विचाराच माणूस निवडून आणायचा होता. म्हणून मी त्याला सांगितलं उमेदवारी अर्ज भर आणि मी सांगेपर्यंत मोबाइल स्विच ऑन करू नको.
माला खात्री होती निवडणुक झाली तर निश्चित लक्ष्मणला तिथून निवडुन आणेल आणि निवडणुक झाली आणि लक्ष्मण एकतर्फी निवडून आला.” असं अजित पवार म्हणाले.