Tata Tiago Ev: देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारच्या टेस्ट ड्राइव्हला झाली सुरुवात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ जानेवारी । Tata Tiagao EV चे लाँचिंग गेल्या आक्टोबरमध्ये झाले. तेव्हापासून अनेक खरेदीदार भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक वाहनांच्या टेस्ट ड्राइव्हची वाट पाहत आहेत. आता त्याच्या टेस्ट ड्राइव्हला सुरुवात झाली आहे. सध्या टिआगो इव्हीची किंमत८.४९ लाख पासून ११.७९ लाखांपर्यंत आहे.

Tata Tiago EVचे प्रकार
Tiago EV मध्ये २ बॅटरी येतात. २४ kWh क्षमतेची ही बॅटरी येते. एक्स शोरूम प्राईस अनुक्रमे ८..४९ लाख ते ९.०९ लाख या किंमतीमध्ये उपलब्ध आहे. लॉन्ग रेंजमध्ये ५ प्रकारात उपलब्ध आहे. ज्याची किंमत ९.९९ लाखांपासून ११.७९ लाख इतकी आहे. २४ kWh बॅटरीवर चालणारी गाडी ३१५ किमी पर्यंत धावेल. Tiago EV १५A प्लग सॉकेट, ७.२ kWh AC होम वॉल बॉक्स आणि DC फास्ट चार्जर सारखे एकाधिक चार्जिंग पर्याय ऑफर करते.

Tata Tiago EV चे फिचर्स
Tiago EV ला सध्या कोणत्याही स्पर्धेचा सामना करावा लागत नाहीये. Tiago EV ही सेगमेंट नवीन फीचर्सने संपूर्ण आहे अशी खात्री टाटा मोटर्सने केली आहे. यामध्ये EV हॅचबॅक कनेक्टेड टेक आहे. Tata Tiago EV मध्ये क्लायमेट कंट्रोल एअर हे फिचर आहे . तसेच pple CarPlay आणि Android Auto सह ७ इंचाचा टचस्क्रीन विंडो, क्रूझ कंट्रोल, ८ स्पीकर हरमन म्युझिक सिस्टीम असेही काही फीचर्स टाटा टिआगो मध्ये येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *