Governor controversy: शिवरायांचा पुन्हा एकेरी उल्लेख? राज्यपाल कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ जानेवारी । राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या व्यक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर संबंधित व्हिडीओ ट्विटदेखील केला आहे.

अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहतात की, “राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख. नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?” असे प्रश्न अमोल मिटकरी यांनी व्हिडीओ ट्विट करत उपस्थित केले आहेत.

अमोल मिटकरी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राज्यपालांनी हिंदीत एक वक्तव्य केल्याचं दिसत आहे. “सब लोग कहते हैं की शिवाजी होने चाहीए, चंद्रशेखर होने चाहीए, भगतसिंह होने चाहीए, नेताजी होने चाहीए, लेकीन मेरे घरमें नही तो दुसरे के घरमे होने चाहीए”, असं राज्यपाल या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

यासंबधी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “राज्यपालांकडून वारंवार अशी वक्तव्ये करण्यामागील कारण काय हे जरा महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिलं पाहिजे ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जबाबदारी आहे, असं मला वाटतं” असं मिटकरी म्हणलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *