महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ जानेवारी । उद्या राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं होतं. आता उद्या या प्रकरणावर घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीवेळी हे प्रकरण पाच जणांच्या घटनापीठाऐवजी सात जणांच्या घटनापीठाकडे सोपवण्यात यावे अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली होती.
गेल्या सुनावणीवेळी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच जणांच्या घटनापीठाऐवजी सात जणांच्या घटनापीठाकडे सोपवण्यात यावे अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली होती. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाकडून या प्रकरणी सुनावणीची पुढील तारीख दहा जानेवारी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार आता उद्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. उद्या होणाऱ्या या सुनावणीमध्ये सत्तांतराचा तिढा सुटणार की, हे प्रकरण सुनावणीसाठी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोनही गटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना या नावावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हे चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला होता. पक्षाचं चिन्ह नेमकं कोणाचं याबाबत निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी डिसेंबरमध्ये झाली होती. त्यानंतर पुढील सुनावणी ही जानेवारी महिन्यात घेण्यात येईल असं आयोगानं म्हटलं होतं. त्यानुसार आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 12 किंवा 13 जानेवारीला होण्याची शक्यता आहे.