आम्ही चीनशी सर्व संबंध तोडू शकतो ; डोनाल्ड ट्रम्प

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – वॉशिंग्टन – विशेष प्रतिनिधी – फॉक्स बिझनेस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाचं उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की,सध्या ते चीनी राष्ट्रपती शी चिनफिंगसोबत सध्या कोणतीच चर्चा करू इच्छित नाही. महत्वाचं म्हणजे ट्रम्प यांची चिनफिंगसोबत खूप चांगले संबंध आहे. पुढे ते म्हणतात की,चीनने त्यांना निराश केला आहे. तसेच अमेरिकेने चीनला अनेकदा कोरोनाच्या चाचणीकरता वुहानच्या प्रयोगशाळेत जाण्याची परवानगी द्यावी. मात्र त्यांनी ती नाकारली. अमेरिकेने चीन विरूद्ध सर्वात मोठ असं आक्रमक रुप धारण केलं आहे. अमेरिकेत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला चीनलाच जबाबदार धरलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात कोरोना पसरल्यामुळे चीनशी सर्व संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. जगभरात तीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये ८०,००० अमेरिकेतील नागरिकांचा समावेश आहे.

ट्रम्पने संबंध तोडण्याची दिली धमकी, फॉक्स बिझनेस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, ‘अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही करू शकतो. आम्ही सर्व संबंध तोडू शकतो.’ गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रपती चीनच्या विरोधात कारवाई करण्यासाठी दबाव टाकत आहेत. खासदार आणि तज्ज्ञांची असं म्हणणं आहे की, चीनच्या निष्क्रियतेमुळे वुहानमधील कोरोना जगभर पसरला.

तसेच अमेरिका सरकारने कोरोना व्हायरसवरील वॅक्सीन शोधण्यास वैश्विक युतीचा हिस्सा न होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अमेरिका स्वतः वॅक्सीन शोधत आहे. theguardian.com च्या रिपोर्टनुसार, ट्रम्प सरकारने ‘अमेरिका फस्ट’ असा दावा केला आहे. यामुळे विश्वात कोरोनाशी लढण्यासाठी वॅक्सिन तयार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

ब्रिटन, चीन, कनाडा, तुर्की, सऊदी अरब, जपानसह अनेक देशांनी जागतिक आरोग्य संघटना, गेट्स फाऊंडेशन आणि युरोपिअन कमिशनसोबत एकत्र येऊन वॅक्सीनवर काम करण्यासाठी वर्चुअल ग्लोबल समिटचं आयोजन केलं होतं. मात्र अमेरिकेकडून कुणीही यामध्ये सहभागी झालं नाही. या समेट दरम्यान वॅक्सीनकरता ८ बिलियन डॉलर फंड जमा करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *