महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपायला केवळ तीन दिवस बाकी आहेत. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त आहे. दरम्यान या लॉकडाऊनच्या काळात अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेत. पहिल्या दोन लॉकडाऊनमध्ये घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे बरीच लोकं वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेत. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथील करण्यात आले. त्यामुळे अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाता येणार आहे. त्यासाठी ई पासची सेवा सुरु केली आहे.
आपात्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रा बाहेर प्रवास करण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार आपण https://t.co/jR6ROcjBYm वर E-Pass साठी अर्ज करू शकता.
पास केवळ अत्यंत आपात्कालीन परिस्थितीतच देण्यात येईल. pic.twitter.com/YyLL09FGuU
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) May 13, 2020
सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ई पास दिला जात आहे. दरम्यान पोलिसांननी यासाठी एक नियमावली तयार केली आहे. जाणून घेऊया त्या नियमावलीबद्दल.
आपात्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रा बाहेर प्रवास करण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार आपण http://covid19.mhpolice.in वर E-Pass साठी अर्ज करू शकता.
पास केवळ अत्यंत आपात्कालीन परिस्थितीतच देण्यात येईल.
http://covid19.mhpolice.in वर जा.
संकेतस्थाळावर गेल्यानंतर तुम्हाला Apply for Pass Here पर्याय दिसेल.
तिथे सर्व तपशील योग्य पद्धतीनं भरा आणि संबंधित कागदपत्रे जोडा.
सर्व माहिती दिल्यानंतर Submit वर क्लिक करा. प्राप्त झालेला Token ID सेव्ह करुन ठेवा.
http://covid19.mhpolice.in वर आपण पासची स्थिती तपासू शकता आणि पास मंजूर झाल्यावर तो डाऊनलोड करु शकता.
हा फॉर्म केवळ इंग्रजी भाषेतच भरावा लागणार आहे. सर्व कागदपत्रांची एकच फाईल तयार करावी लागेल. तुमचा ई पास मिळाल्यानंतर त्याची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी तुमच्याजवळ प्रवास करताना ठेवा.
ऑफलाईन ई पास मिळवण्याची प्रक्रिया
ऑफलाईन ई पास मिळवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तु्म्हाला अर्ज करावा लागेल.
सध्या राहत असलेला पत्ता, जाण्याच्या ठिकाणाचा पत्ता, किती लोक जाणार, त्या प्रत्येकाची नावं, मोबाईल नंबर, पत्ता, पॅनकार्ड किंवा आधारकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्रं, कोणत्या वाहनाने जाणार त्याची माहिती त्या अर्जात भरावी लागणार आहे.
यात बसची व्यवस्था स्वत:च करायची आहे. तसेच बसमधून केवळ 22 लोकांनाच जाता येणार आहे. बससाठी पैसे जमा करूनही बसची व्यवस्था झाली नाही तर पोलिसच स्वत: बसची व्यवस्था करून देता हेत.
या संपूर्ण प्रक्रियेतून पार पडल्यानंतरच पोलिसांकडून ई-पास दिला जातो. त्याशिवाय ई-पास दिला जात नाही. शिवाय कंटेन्मेंट झोनमधील लोकांना ई-पास दिला जात नाही. तसंच कंटेन्मेंट झोनमधील नसलेल्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे, जर तो परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये असेल तर पास मिळत नाही. शिवाय ज्या गावाला जाणार आहात, त्या गावच्या प्रमुखाची एनओसीही आवश्यक आहे.