महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० जानेवारी । लक्ष्मण रोकडे। कोविडच्या काळात मुख्यमंत्र्यासह राज्यसरकार घरात होते तेव्हा माझा मनसे सैनिक जीवाची परवा न करता रत्यावर नागरिकांची सेवा करत होता, त्याचवेळी आमच्या रणरागिणी अनिता पांचाळ यांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यापासून त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना राबविल्याचे सांगत शर्मिलाताई ठाकरे यांनी मनसेच्या पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षा अनिताताई पांचाळ यांच्या कार्याचे कौतुक करताना “माझ्या मनसैनिकाचा मला अभिमान आहे” असे बोलल्या.
अनिता पांचाळ यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या गौरी गणपती स्पर्धा, नवरात्र नवरंग महिला वेशभूषा स्पर्धा व किल्ले बनवा, इतिहास जगवा स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम काळेवाडी येथील ज्योतिबा उद्यान येथे रविवारी सायंकाळी संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शर्मिलाताई ठाकरे या बोलत होत्या.
यावेळी मनसे महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस रिटा गुप्ता, प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष गणेशआप्पा सातपुते, प्रदेश उपाध्यक्ष रणजित शितोळे, शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला शहराध्यक्षा अश्विनी बांगर यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शर्मिलाताई ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिलाताई ठाकरे यांच्या हस्ते आपल्याला बक्षीस मिळत असल्याचे पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहन होता. ठाकरे यांनी देखील सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले. व अनिता पांचाळ यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील काळात प्रतिनिधित्व करण्यासाठी महापालिकेत पाठवा असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी बड्डे आहे भावाचा फेममधील शेखर गायकवाड आणि एकदम कडक फेम मधील अवधूत कुलकर्णी यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला मोठी रंगत आली.