हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ जानेवारी । माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या घरावर आज सकाळी छापे पडले. वर्षाच्या सुरुवातीलाच हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली होती. आज सकाळी त्यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. सकाळी 6 वाजल्यापासून ही कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

ईडीकडून सध्या हसन मुश्रीफ यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या कागलमधील घरावर छापे टाकले आहेत. त्यांच्या मुलाच्या घरावरही छापे पडले होते. या प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे.

काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांचावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले होते. 2700 पानी पुरावे घेऊन सोमय्या ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखानामध्ये कोट्यवधी रुपयांची बेनामी शेअर कॅपिटल भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यासाठी पुरावे घेऊन सोमय्या ईडीच्या ऑफिसमध्ये गेले होते. ईडीमधील ४ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक झाली. कागदोपत्री पुरावे दिले, अशी माहिती सोमय्यांनी दिली होती.

‘शेतकऱ्यांनी या साखर कारखान्यामध्ये गुंतवणूक केली आहे. पण हसन मुश्रीफ परिवारामधील सहा व्यक्तींचा सहभाग असल्याचा किरीट सोमय्या यांनी दावा केला. अबिद हसन मुश्रीफ ,नाविद हसन मुश्रीफ, साजिद हसन मुश्रीफ, नबिला अबिद मुश्रीफ, सबिना साजिद मुश्रीफ, साहेरा हसन मुश्रीफ, यांची नावे आहेत. या व्यक्तीच्या नावाने 13 कोटी 30 लाख 49 हजार रुपयांची गुंतवणूक केली. हसन मुश्रीफ यांनी भ्रष्टाचार करून काळा पैसा पांढरा करून मनी लाँड्रिंग करून 78 कोटी 91 लाख 51 हजार 830 रुपयांचे शेअर घेण्यात आले असा आरोपही सोमय्यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *