Maharashtra Cold Wave : राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे; थंडीची लाट आणखी तीव्र होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ जानेवारी । राज्यात मागच्या चार दिवसांपासून पारा घसरत चालल्यामुळे बहुतेक जिल्ह्यात जोरदार थंडी पडत चालली आहे. उत्तर भारतात आलेल्या थंडीचा परिणाम महाराष्ट्रात पहिल्यांदा विदर्भातील जिल्ह्यांवर झाला. यानंतर राज्यातील जवळपास 20 जिल्ह्यात 15 अशांच्या खाली पारा गेल्याने थंडीची लाट आली आहे. उत्तर भारतातील शीतलहर तसेच दाट धुक्यामुळे राज्यातही थंडीची लाट आली आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत पारा आणखी खाली जाण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.

राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात बुधवारपासून अनेक ठिकाणी तापमानात आणखी 3 ते 4 अंशाने घट होणार आहे. तर कोल्हापूर, सातारा, पुणे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीचा कडाका अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. याचबरोबर मुंबईतही तापमान घटनार आहे. तर कोकणातील काही जिल्ह्यात दिवसा उन्हाचा चटका तर रात्री काही प्रमाणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे. थंडी जोरदार पडल्याने शेतकऱ्यांना आपली कामे ही उशीरा करण्याची वेळ येत आहे.

राज्यात मागच्या 24 तासांत मंगळवारी बहुतेक ठिकाणी किमान तापमानात 1 अंशाने घसरण झाली. राज्यातील 10 शहरांतील पारा दहा अंशाखाली होता. नाशिक जिल्ह्यातील ओझरला पुन्हा राज्यातील नीचांकी 4.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. नाशकात पारा7.6 तर औरंगाबादेत 7.7 वर होता. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पारा दहा अंशाखाली आला आहे. बुधवारपासून मुंबईसह कोकणातही नागरिकांना थंडीचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान दिल्ली ते मुंबई राजधानी एक्स्प्रेस 12 तास, सचखंड एक्स्प्रेस 10 तास पठाणकोट एक्स्प्रेस 7 तास, पवन एक्स्प्रेस 2 तास तर हजरत निजामुद्दीन ते वास्को गोवा एक्स्प्रेसवरही थंडीचा परिणामम झाल्याने या गाड्याही उशिराने धावत आहेत. दरम्यान मागच्या 24 तासांत नाशिक जिल्ह्यातील ओझर 4.9, जळगाव 5.3, धुळे 5.5, पुणे 7.4, नाशिक 7.6, औरंगाबाद 7.7, गोंदिया 8.6, गडचिरोली 9.2, नागपूर 9.3, यवतमाळ 9.5 अशी नोंद झाली.

जळगाव जिल्हा 5 अशांखाली

राज्यभरात थंडीचा कडाका वाढू लागला असून जळगावचे किमान तापमान 5 अंशापर्यंत खाली आल्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम दिसून आला. याआधी जळगाव शहराचे किमान तापमान 2011 मध्ये 2 अंशापर्यंत खाली आले होते. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी जळगाव शहरात सर्वांत कमी म्हणजेच 5 अंशाची नोंद झाली आहे. जानेवारी 2022 मध्ये जळगाव शहराचा पारा 5.2 अंशापर्यंत खाली घसरला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *