महाराष्ट्र २४- ऑनलाईन -विशेष प्रतिनिधी -संजीवकुमार गायकवाड – नांदेड -:- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या कोविड 19 अवेरनेस प्रोग्राम मध्ये शंभर टक्के गुण घेऊन पात्र ठरल्याबद्दल लॉयन्सचा डबा या उपक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण डॉ . दिलीप ठाकूर यांना विद्यापीठाने प्रशस्तीपत्र देऊन गौरव केलाहे प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल डॉ .. ठाकूर यांचे लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष लॉ. डॉ. विजय भारतीया, उपाध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, सचिव लॉ. डॉ. मोहन चव्हाण, कोषाध्यक्ष लॉ. शिवा शिंदे, लॉ. डॉ .. उमेश मेगदे, लॉ. शैलेश पाटनूरकर, सतेज राजपूत यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे.
या दरम्यान लॉयन्सचा डबा या उपक्रमांतर्गत 50 दिवसाखेर 285 दानशूर नागरिकांनी 30145 डबे दिले आहेत. त्यामध्ये लॉयन्स क्लब नांदेड प्राइडचे लॉ.तेजस दिलीप मोदी यांनी 200 डबे दिले आहेत.बापू कदम ठाणे, राजेंद्र गिल पुणे,धर्मराज सवने पुणे, प्रविण बिरादार पुणे, दुष्यन्त आठवले औरंगाबाद, पांडुरंग वानखेडे अमरावती,दिलीप पाध्ये, दिगंबर व्यंकागौड केसरे देगलूर,सौ. कामिनी ब्रिजभूषण राणा हैद्राबाद, रेखाताई काळे यांनी प्रत्येकी 100 डबे दिले आहेत.कु. त्विषा प्रणील कांडलकर इंग्लड हिच्या वाढदिवसानिमित्त वरद मुव्हीज शिवाजीनगर नांदेड यांनी आणि स्व. नारायणराव पांडुरंगराव चन्नावार यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच कै.लालागौड ईरागौड औरादकर करडखेड ता.देगलूर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रत्येकी 100 डबे दिले आहेत
.प्रा.बब्रुवान मोरे अहमदपूर, शिल्पा अमित जायस्वाल हैद्राबाद,अनुप अग्रवाल, जितेंद्र अग्रवाल, देवांश स्वप्नील जायस्वाल पुणे याच्या वाढदिवसानिमित्त तसेच कुसुम व जगदीशप्रसाद जायस्वाल यांच्या लग्नाच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त स्नेहलता जायस्वाल यांनी प्रत्येकी 50 डबे दिले आहेत.स्व. अनुराधा व्यंकटेश कवटेकवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ, कै.रजनी चंद्रकांत जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ डॉ.बालकृष्ण जोशी यांनी व सौ.दीपा जोशी यांनी, स्व. दुर्गाप्रसादजी गणेशलालजी सारडा यांच्या स्मृती प्रित्यर्थ सारडा परीवार मालेगांव यांनी प्रत्येकी पन्नास डब्बे देऊन आपल्या नातेवाईकांच्या स्मृती जपल्या आहेत. शनिवारी कै. रामचंद्र जायस्वाल यांच्या स्मरणार्थ रवी जायस्वाल यांच्यातर्फे शंभर डबे करीत करण्यात येणार आहेत.लॉक डाऊन चा कालावधी वाढण्याची शक्यता असली तरी सतरा मे पर्यंतच हा उपक्रम चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसासाठी चौदाशे डब्याची आवश्यकता असल्यामुळे अन्नदात्यांनी सहकार्य करावे असे आवाहन लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे करण्यात आले आहे.