Eknath Shinde : CM शिंदेंनी आता गाजवलं क्रिकेटचं मैदान, केली तुफान फटकेबाजी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ जानेवारी । गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते विविध कार्यक्रमात हजेरी लावतात. त्या कार्यक्रमात सहभागी होतात. आपल्या भाषणातून तूफान फटकेबाजी देखील करतात. यावेळी मात्र एकनाथ शिंदे यांनी मैदानावर तूफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मैदानावरील उत्साह पाहून खेळाडू यांच्यासह चाहत्यांचाही उत्साह वाढल्याचे दिसून आले आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटकडून काल ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या क्रिकेट स्पर्धेला हजेरी लावून स्पर्धकांचा आणि चाहत्यांचा उत्साह वाढवला.

एकनाथ शिंदे यांना यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवून मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरले आणि त्यांनी जोरदार बॅटिंग देखील केली. मुख्यमंत्र्यांनी आलेल्या प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर मारला केला. मुख्यमंत्र्यांची ही तुफान फटकेबाजी पाहून खेळाडूंनीही टाळ्या वाजवून शिंदेंचा उत्साह वाढवला.

इतक्यात एकनाथ शिंदे मंचावर आपल्या भाषणातून विरोधकांवर तूफान फटकेबाजी करत असतात. मैदानावर मात्र शिंदे यांनी आपले छुपे गुण दाखवले आहेत. काल मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकार, षटकारांची आतषबाजी करत मैदान मैं भी हम भी कुछ कम नही हे दाखवून दिलं आहे. साक्षात मुख्यमंत्र्यांनाच तुफान फटकेबाजी करताना पाहून खेळाडूंचाही चांगलाच उत्साह वाढला. एकनाथ शिंदे यांच्या या तुफान फटकेबाजीची चर्चा राजकीय वर्तुळातही रंगु लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *