महाराष्ट्र 24 : विशेष प्रतिनिधी लक्ष्मण रोकडे :आज दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष श्री नितीन शिंदे यांनी इचलकरंजी कोल्हापूर येथे दीप गंगा भागीरथी यांच्या शारदा वृद्धआश्रम या पहिल्या शाखेला प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटक म्हणून भेट दिली.या वेळी तरुण तडफदार वैचारिक कोल्हापूर समाजकल्याण सहआयुक्त मा श्री विशालजी लोंढे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून होते.तसेच मधु ताराच्या प्रमुख संस्थापिका सचिव प्रा डॉ सलमा आलम मॅडम.उद्योजिका प्रिया डुघरेकर. गोळाफेक खिलाडू गीता शिंदे.तसेच राज्यभरातून आलेले मान्यवर उपस्थित होते.या वेळी श्री नितीन शिंदे यांनी संस्थेचे प्रमुख हिंद रत्न श्री दीपकजी लोंढे यांनी मधु ताराला आमंत्रित केल्या बद्दल धन्यवाद मांडले. तसेच मधु ताराच्या वतीने शक्य त्ती मदत करण्यात येईल असे सांगताच आज देवाला सुट्टी आहे ही कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या वेळी सूत्र संचालक म्हणून श्री नितीनभाऊ विद्रोही यांनीही मार्मिक कविता आणि उत्कृष्ट सूत्र संचालन केले. या वेळी श्री दीपकदादा लोंढे यांच्या मातोश्री.पत्नी आणि दोन्ही मुले प्रामुख्याने उपस्थित हते.सकाळी कोल्हापूर दौऱ्यावर असताना भा जा पा नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी योगायोगाने एकाच ट्रेन मध्ये असल्याने सदिच्छा भेट झालीआणि शहरातील रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी सुध्धा आरोग्यावर माहिती मार्गदर्शन श्री नितीन शिंदे यांनी दिली