![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ जानेवारी । अनेक नेते गर्दी दिसली की पळून जाण्यात पटाईत असतात. पण, त्या गर्दी दिसल्यावर भर रस्त्यात थांबल्या अन मदतीसाठी धावल्या. ही चित्रपटातील कथा नव्हे हा अाँखे देखा हाल आहे! सध्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त पोलीस व विविध सामाजिक संघटनांकडून रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत सर्वत्र जनजागृती अभियान सुरू आहेत.
रविवारी (ता. १५) वाकड भूमकर चौकातील एका समाजसेवी संस्थेकडून पथनाट्य सुरू असताना अचानकपणे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे माणसांची गर्दी पाहून थांबल्या. त्यांनी वाहन वाहन चालकांना वाहन सुरक्षिततेबाबात मार्गदर्शन केले. या निमित्ताने उपस्थित नागरिकांत खासदार सुळे यांच्या समय सुचकता आणि माणुसकी भावनेचे कौतुक मात्र झाले.
याबाबत माहिती अशी, भूमकर चौकात दुपारी साडेबाराला पि. डी फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेकडून राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त हेल्मेट न वापराचे दुष्परिणाम पथनाट्याद्वारे दाखवीले जात होते यात एका दुचाकीस्वाराचा अपघात होतो तो रस्त्यावरील सिमेंटच्या ब्लॉकवर आदळतो त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. पथनाट्य पाहण्यासाठी व खरोखरीच अपघात झाला असे वाटणाऱ्यांची तुफान गर्दी, कुजबुज अन तर्कवितर्क सुरू होते. त्याचवेळी या चौकातून खासदार सुप्रिया सुळे एका स्पर्धेच्या उदघाटनासाठी हिंजवडीच्या दिशेने जात होत्या.
गर्दी पाहून त्यांनी गाडी थांबवली अपघात झाल्याचे समजून त्या मदतीला धावल्या. तिथं गेल्यावर त्यांना समजले. हा अपघात नसून पथनाट्य आहे. त्यावेळी सुळे यांनी प्रबोधनात सहभाग घेत रस्ता सुरक्षेचे महत्त्व सांगून नागरीकांना वाहतूक नियम पाळण्याचा सल्ला दिला, त्या स्वयंसेवी संस्थेच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले. नागरिकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या. बावधन ते वाकड परिसरातील सेवारस्त्याने जाताना रस्त्याची दुरवस्था पाहून त्यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना रस्ता दुरुस्तीबाबत संबंधितांना सूचना करण्याची विनंती केली आहे.
प्रतिक्रिया
खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्ता सुरक्षा अभियानात अचानकपणे सहभाग घेत नागरिकांना तर सुचना केल्याचं त्याशिवाय रस्ता सुरक्षेसाठी आपण मिळुन काम करू असे सांगितले. आमच्या कामाचे कौतुक करत इथून पुढे तुम्हाला कसलीही मदत लागली तर मला कॉल करा मी तुमच्या सोबत आहे असा शब्द दिल्याने आम्ही सर्व भारावलो
– औदुंबर कळसाईतकर, संस्थापक अध्यक्ष:- पी डी फाउंडेशन