![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।लक्ष्मण रोकडे । १७ जानेवारी । १६ नंबर, पोलीस लाईन रोड ,भाजीमंडई समोरील अण्णाभाऊ साठेनगर-२ ही झोपडपट्टी मागील १० ते १२ वर्षांपासून आहे. याठिकाणी जवळपास ७० कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथील सर्व नागरिक मागासवर्गीय, भटक्या विमुक्त, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, वंचित घटकातील असून. यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला,लहान मुले यांचा समावेश आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून हे नागरीक याठिकाणी येऊन स्थायिक झाले आहेत . दिवसभर कामानिमित्त इतरत्र भटकून कसे बसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात .
त्यातील अनेकांची मुले जवळच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत केंद्र व राज्यसरकार सर्वाना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. अशा परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठेनगर २ मधील जवळपास ३८ मुले जवळच्या “नागू गतिराम बारणे” या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे कारवाई झाल्यास येथील नागरिक बेघर होऊन. त्यांच्या सर्व मुलांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्क हिरावून घेतल्यासारखे होईल. पिंपरी चिचंवड नवनगर विकास प्राधिकरणच्या धिकाऱ्यांमार्फत आण्णाभाऊ साठेनगर २ या ठिकाणी जाऊन नागरिकांना भीती दाखवत आहेत. दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी सकाळी तेथील नागरिकांना लेखी सूचना किंवा नोटीस न देता मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यासाठी पिंपरी चिचंवड नवनगर विकास प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते .त्यांना शासकीय आदेश दाखवण्यास सांगितले असता तो तेथिल झोपडी धारकांस दाखवण्यात आला नाही. त्यावेळी तेथील पोलीस व प्राधिकरण्याच्या कर्मचाऱ्यांनी वस्तीतील घरांवरील निळे झेंडे हटवले तसेच नागरिकांचे घरावरील छप्परे काढून घेतली. नागरिकांना दमदाटी करण्यात आली. अशाप्रकारे या नागरिकांना बेघर करून त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करण्यात आलेले आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु असून थंडीबाबत नागरिकांना सुरक्षेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच हायअलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. या अचानक कारवाईमुळे त्यांना इतरत्र व्यवस्था करणे देखील शक्य नाही.
अशा परिस्थितीत त्यांना बेघर करणे योग्य ठरणार नाही. तसेच तेथील मुलांच्या शिक्षणाचा विचार करता मुलांच्या परीक्षा पूर्ण होईपर्यंत या सर्वांचा माणुसकीच्या दृष्टिकोनातून सहानुभूतीपूर्वक विचार करून अण्णाभाऊ साठेनगर येथील झोपडपट्टी धारकांवरील कारवाई तात्पुरती स्थगित करून त्यांनामुलांच्या परीक्षा पूर्ण होईपर्यंत अंदाजे मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत मुदतवाढ द्यावी. मागासवर्गीय भटक्या गोरगरीब जनतेला सहानुभूती पूर्वक व माणुसकीच्या दृष्टिकोनातून सहकार्य करावे सदर मागणीचा विचार करावा असे सिद्दीकभाई शेख,व मानव कांबळे यांनी यावेळी सांगीतले.