महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।लक्ष्मण रोकडे । १७ जानेवारी । पिंपरी-चिंचवड ।चिंचवडमधील प्रेमालोक पार्क जवळ पीएमपीएमएल बसला अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. याबाबत माहिती देताना, पोलीस निरीक्षक चिंचवड वाहतूक विभागाचे प्रदीप पाटील म्हणाले की, “सुमारे 3.30 वा प्रेमालोक पार्क जवळील मुख्य रस्त्यावर पीएमपीएमएल बसला अपघात झाला होता. यामध्ये बस रस्ता दुभाजकावर चढली होती. ही बस खंडोबा माळ हून दळवीनगर मार्गे पुणे स्टेशनला जात होती.
अपघात झाल्यानंतर वाहतुक पोलीस अधिकारी व कर्मचारी तेथे पोहोचले. बस मध्ये 20 ते 25 प्रवासी होते पण सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. पीएमपीएमएलला क्रेन बोलावून बस दुभाजकावरून बाजूला रस्त्यावर काढण्यात आली. तसेच तेथे रस्त्यावर ऑइल सांडल्याने अग्निशमन विभागाला कळवण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या प्राधिकरण अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, एक अग्निशमन बंब 4.30 वा दळवीनगर जवळील प्रेमलोक पार्क येथे पाठवण्यात आला होता.त्यावेळी रस्त्यावर ऑइल सांडले होते. ते पाणी मारून 45 मिनिटात साफ करण्यात आले.