Raghuram Rajan : ते पप्पू नाहीत तर..; काय म्हणाले RBI चे माजी गव्हर्नर?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ जानेवारी । काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) याचं नेतृत्व करत आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी राहुल गांधींबाबत मोठं वक्तव्य केलंय.

राजन म्हणाले, राहुल गांधींची ‘पप्पू’ प्रतिमा खूपच दुर्दैवी आहे. काँग्रेसचा हा खासदार ‘पप्पू’ नसून हुशार व्यक्ती आहे. रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान हे वक्तव्य केलंय.

राजन पुढं म्हणाले, ‘मला वाटतं की राहुल गांधींची ‘पप्पू’ प्रतिमा दुर्दैवी आहे. त्यांच्याशी अनेक आघाड्यांवर संवाद साधण्यात मी जवळपास एक दशक घालवलं आहे. ते कोणत्याही अर्थानं मला ‘पप्पू’ वाटत नाहीत. राहुल एक हुशार, तरुण, जिज्ञासू व्यक्ती आहे.’

भारत जोडो यात्रेच्या मूल्यांसाठी ते राहुल गांधी यांच्यासोबत गेल्याचंही राजन म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्राच्या आर्थिक धोरणांवरही टीका केली. मी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो. कारण, मी पदयात्रेच्या मूल्यांसाठी तिथं गेलो. मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *