IND vs NZ पुन्हा मालिका विजयासाठी भारत सज्ज

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२१ जानेवारी । हैदराबादेत निसटता विजय मिळविणारा हिंदुस्थानचा संघ पुन्हा एकदा मालिका विजयासाठी सज्ज झाला आहे. गेल्याच आठवडय़ात टीम इंडियाने श्रीलंकेचा 3-0ने धुव्वा उडविला होता, तर आता न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामनाही जिंकून 2-0 आघाडी घेत मालिका खिशात घालण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. मात्र सलामीच्या लढतीत हिंदुस्थानी गोलंदाजांच्या तोंडातून फेस काढणारा न्यूझीलंड प्रथमच वनडेचे आयोजन करण्याची ंसंधी लाभलेल्या रायपूरमध्ये मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्यानेच उतरणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानने 349 धावांचा पाऊस जरी पाडला असला तरी त्या डावात शुभमन गिलचाच वन मॅन शो होता. त्याच्या विक्रमी द्विशतकामुळे हिंदुस्थानला हा टप्पा गाठता आला. अन्य फलंदाजांना अर्धशतकी खेळीही करता आली नव्हती. हिंदुस्थानी फलंदाजांचे अपयश गिलच्या खेळीमुळे लपले आहे, पण गोलंदाजांना क्षमा मिळण्याची कमी शक्यता आहे. इतकी मोठी धावसंख्या आणि चांगली सुरुवात मिळूनही हिंदुस्थानी गोलंदाजीच्या मायकल ब्रेसवेलने चिंधडय़ा उडवल्या होत्या. त्यामुळे गोलंदाजीत काही बदल होऊ शकतात. उमरान मलिक आणि शार्दुल ठाकूरचे संघात असणे संघाच्या हिताचे आहे. त्यामुळे अपयशी ठरत असलेल्या मोहम्मद शमीला संघाबाहेर बसविण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सामन्यातही युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवपैकी एकालाच संधी मिळेल.

असा असू शकतो संघ

हिंदुस्थान ः रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

न्यूझीलंड ः फिन अॅलन, डेव्हन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरील मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, ईश सोधी, डग ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *