शिवजयंतीपूर्वीच सरकार कोसळणार ; मविआ च्या या नेत्याचे भाकीत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२१ जानेवारी । राज्यात महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे शिवसेना कोणाची यावरुन सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, काल केंद्रीय निवडणूक आयोगात धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुनावणी झाली. आता, पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी होणार आहे. तत्पूर्वी शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. तसेच, लवकरच हे सरकार कोसळणार असल्याच भाकीतही केलं जात आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी 14 फेब्रुवारी रोजी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर, आता आमदार अमोल मिटकरी यांनीही नवी डेडलाईन दिली आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकार 14 फेब्रुवारी कोसळेल असा दावा केला. त्यानंतर, आता अमोल मिटकरींनीही नवी तारीख दिली आहे. सरकारचे काउंटडाऊन सुरू झाले असून येत्या शिवजयंतीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार आहे. सरकारमध्ये अस्वस्थता असल्याने हे सरकार कोसळलेलं दिसणार. शिवजयंतीपूर्वीच शिंदे आणि फडणवीस सरकार कोसळणार असं भाकीत आमदार मिटकरी यांनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मुंबईत बी.एम.सी संदर्भात झाली असली तरी, बी.एम.सीवर भगवा शिवसेनेचा फडकणार. या सरकारचा कार्यकाळ फक्त 15 ते 20 दिवसांचा आहे. महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार हे जास्त दिवस राहणार नाही. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती लागवड लागू शकते, असं मतही मिटकरी यांनी व्यक्त केलं. दरम्यान, 14 फेब्रुवारीपासून अपात्र आमदारांसंदर्भातील सुनावणी सलग होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात सरकारचं भवितव्य ठरणार हे मात्र निश्चित मानले जात आहे.

धनुष्यबाण चिन्हाबाबतही सुनावणी सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आता दोन्ही गटांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे धनुष्यबाण चिन्हासाठीही दोन्ही गटांनी दावा केला आहे. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, आज सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी पक्षप्रमुखपदासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *