मूल होत नसल्याने पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातून अघोरी प्रकार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२१ जानेवारी । पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातून (Pune Crime) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मूल होत नसल्यामुळे एका विवाहितेला सासरच्या लोकांनी मानवी हाडांची पावडर आणि घुबडाचे पाय खाण्यासाठी जबरदस्ती केली. इतकच नाही तर कोंबडीची अघोरी पूजा करून त्याची राख पाण्यातून पिण्यास दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर विवाहितेचा छळ, नरबळी आणि अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सासरच्या लोकांनी या विवाहितेच्या आई-वडिलांकडे वारंवार पैशाची मागणी केली. इतकच नाही तर घरात भरभराट व्हावी आणि या महिलेला मुलगा व्हावा यासाठी पती सासू-सासरे धीर जाऊ यांनी मिळून घरात वारंवार अघोरी पूजा केली.

प्रत्येक अमावस्येला आरोपी एकत्र जमून काय कपडे घालत आणि तळघरात अघोरी पूजा करत. कोरोनानंतर आर्थिक परिस्थिती डबघाई झाल्यानंतर आरोपींनी अमावस्येच्या दिवशी अघोरी पूजा मांडली. अमावस्येच्या दिवशी सर्व आरोपी जवळच्या स्मशानभूमीमध्ये गेले. तिथे झालेल्या मृतदेहाचे हाडे गोळा केली राख घेतली. हे सर्व घरी आणले आणि त्याची पूजा करून हे पाणी फिर्यादीला पिण्यासाठी दिले.

दरम्यान 21 फेब्रुवारी 2021 रोजी या महिलेच्या जावेच्या निगडी येथील घरी (Pune Crime) पूजा घालण्यात आली. त्यासाठी मयत माणसाचे केस, हाडे, घुबडाचे पाय, आणि कोंबडीचे धड हे सर्व आधीच आणून ठेवले होते. त्यानंतर एका मांत्रिक महिलेने या ठिकाणी अघोरी पूजा केली.

मानवी हाडाची भुकटी या महिलेला खाण्यास भाग पाडली. फिर्यादीने खाण्यास नकार दिल्याने बंदुकीच्या धाकाने तिलाही पावडर खाण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर तू पांढऱ्या पायाची आहेस तसेच मूल होत नाही म्हणून वाईट शब्द वापरुन फिर्यादीचा छळ केला. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *