Gold-Silver Price on 22 January 2022: आज सोने चांदीच्या किंमती स्थिर, पाहा आजचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२२ जानेवारी । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५२,२५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५२,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७२,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,१०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,२५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,०६० रुपये असेल.मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५२,२५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५७,०६० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,२५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,०६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,३०० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,०९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७२३ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *