गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यांत धडाधड नोकरकपात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२२ जानेवारी । गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंनी 12 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची घोषणा केली आहे. जगातील मोठ्या टेक कंपन्यांतील कर्मचारी कपातीत गुगलचे प्रकरण ताजे आहे. गेल्या काही दिवसांत मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, फेसबुकसारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे.

ट्विटरने 50 टक्के कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरमध्ये काढले

नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वात आधी मोठी टेक कंपनी ट्विटरने एकदाच 3800 कर्मचाऱ्यांना काढण्याची घोषणा केली. ही आकडेवारी ट्विटरमध्ये काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 50 टक्के होती. यानंतर काही दिवसांतच एलॉन मस्क यांनी 4500 कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे नोटिस न देताच अचानक या कर्मचाऱ्यांना काढण्यात आले होते. यांना नोकरीवरून काढल्याचे तेव्हा कळाले जेव्हा त्यांच्या डिटेल्सनी त्यांचे अकाऊंट लॉगईन झाले नाही. यादरम्यान मस्क यांनी भारतीय टीममध्ये काम करणाऱ्या 230 पैकी 180 कर्मचाऱ्यांनाही नोकरीवरून काढले.

फेसबुकने 11 हजार कर्मचाऱ्यांना काढले

नोव्हेंबर 2022 मध्ये फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाने एकदाच 11 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना ले ऑफची माहिती देताना लिहिले की, मोठ्या टेक कंपन्या अडचणीच्या काळातून जात आहे. कंपन्यांसाठी नफा कमावणे कठीण होत आहे. अशात कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय कंपनीची मजबूरी आहे.

अमेझॉनने 18 हजार कर्मचाऱ्यांना काढले तर अॅप्पलने भरती थांबवली

ट्विटर आणि फेसबूकशिवाय अमेझॉन तिसरी मोठी कंपनी आहे, जिने 18 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले. यात 1000 भारतीय होते. या श्रृंखलेत स्नॅपचॅट आणि मायक्रोसॉफ्टचेही नाव आहे. तर अॅप्पलने नव्या लोकांची भरती थांबवली आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे होते की लेऑफ म्हणजेच कपातीचा परिणाम गूगलसारख्या कंपनीवर कमी होईल. मात्र डिजिटल जाहिरातींतून होणारी कमाई कमी झाल्याने गूगलही कपात करणाऱ्या कंपन्यांत सहभागी झाली आहे. 2022 मध्ये एकूण 50 मोठ्या टेक कंपन्यांनी जगभरात 1 लाख लोकांना नोकरीवरून काढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *