CM Eknath Shinde : जुन्या पेन्शनविषयी राज्य सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२२ जानेवारी । जुन्या पेन्शन योजनेबाबत (Old Pension Schemes) आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं आहे. त्यामुळं सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार नसल्याचे वक्तव्य विधानसभेत केलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकार या योजनेबाबत सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता आहे. जुन्या पेन्शनविषयी राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. महाराष्ट्राचा शिक्षण विभाग जुनी पेन्शन योजनेचा (OPS) अभ्यास करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारचे कर्मचारी संप करण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनाबाबत आक्रमक झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यानंतर राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोण दाखवल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळं आता जुनी पेन्शन खरच लागू होणार का? पे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्यात जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करणाऱ्या शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा धक्का दिला आहे. जुनी पेन्शन योजना लागू होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत (Maharashtra Assembly Session) स्पष्ट केले होते. जुनी पेन्शन योजना लागू (Old Pension Schemes) केल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अनेक आंदोलन करण्यात आली होती. राज्याचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात आली. या पेन्शन योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर एक लाख 10 हजार कोटींचा बोझा पडेल. यातून राज्य दिवाळखोरीत निघेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

आपल्याकडून जे 156 रुपये कापल्या जातात ते पैसे आज कोटींमध्ये जमा आहेत. सरकार त्याच्यावर लोण काढून सरकार चालवत आहे. त्यामुळं पेन्शनसाठी पैसे बजेटमधून घ्यायची गरज नाही. इतका पैसा आधीपासून जमा आहे. जुनी पेन्शन योजना सुरू करायला काहीच हरकत नसल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आमच्या हाती सत्ता द्या बघा आम्ही कसं सुरू करतो असेही आंबेडकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *