पत्रकार, दिग्दर्शक लक्ष्मण रोकडे यांना खडकी भूषण पुरस्कार जाहीर

Spread the love

Loading

समाजात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तींना इंदिरा कल्याण केंद्रामार्फत दिला जातो पुरस्कार

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . 25 जानेवारी । भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त इंदिरा कल्याण केंद्र खडकीच्या वतीने समाजातील उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तींना खडकी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महाराष्ट्र 24 चे सह संपादक, तथा मराठी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण रोकडे यांना खडकी भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे आयोजकानी सांगितले. सदर कार्यक्रम 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता खडकी येथील इंदिरा कल्याण केंद्र मैदान, जुना बाजार, कुरेश नगर, पुणे, 411 103 या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त समाजबांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे आहेत खडकी भूषण पुरस्कारार्थी…
कलर्स मराठी वाहिनीवरील राजा राणीची ग जोडी मालिका फेम निशा मोरे, मिस पिसीएमसी ग्लोबल व महाराष्ट्र 2021, उद्योजिका, अभिनेत्री टिना क्षत्रिय, अॅडव्होकेट तथा सामाजिक कार्यकर्त्या स्मिता विजय टाकवणे-ढेबे, अभिनेत्री, मॉडेल, मिस हिंदुस्थानी मुंबई 2022 सना शेख, राष्ट्रीय पुरस्कार विजेते, लेखक/दिग्दर्शक (मराठी, हिंदी, कन्नड) अलताफ दादासाहेब शेख, अभिनेता आनंद बुराड, जाकिर हसन, फिल्म दिग्दर्शक, महाराष्ट्र 24 डिजीटल पोर्टलचे सह – संपादक लक्ष्मण रोकडे आदींना खडकी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *