महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ जानेवारी । पुढील 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की निवडणूक आहे म्हणून घोषणा करत नाही, या प्रकारात राज्य सरकार सकारात्मक असेल, 2012 पासून भरती बंद होती ती आम्ही सुरू केली, असे सांगताना पुढील 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची आम्ही भरती करणार असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सर्वच जिल्ह्याने वाढीव मागण्या केल्या आहेत. जेवढ्या पूर्ण करता येणे शक्य आहे त्या पूर्ण केल्या जातील आचारसंहिता असल्यामुळे त्याची घोषणा करता येणे शक्य नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन आयोगाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे. औरंगाबाद मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजन विभागाची बैठक पार पडली यावेळी सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी खासदार आमदार उपस्थित होते.
मराठवाड्याच्या २०२३-२४ वार्षिक नियोजनाची बैठक बुधवारी पार पडली. सुरुवातीला औरंगाबाद जिल्ह्याचा नियोजन विभागाचा आढावा घेण्यात आला त्यानंतर विविध जिल्ह्यांच्या आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आरोग्य मंत्री तानाजी सावंत कृषी मंत्री अब्दुल सत्तार सहकार मंत्री अतुल सावे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्यासह विविध मंत्री उपस्थित होते.