महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ जानेवारी । पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. (maharashtra politics Jayant Patil Sharad Pawar Ajit Pawar Devendra Fadnavis early morning swearing )
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळ आजही चर्चेचा विषय आहे. त्यांच्या शपथविधीला ३ वर्ष पुर्ण झाले आहेत. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उप मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
यासंदर्भात जयंत पाटील यांनी नुकतचं भाष्य केलं आहे. ‘राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्या अनुशंगाने शरद पवारांची ती खेळी असू शकते. राष्ट्रवादी फुटली नाही, शिवसेनेचेच आमदार सोडून गेले. राष्ट्रवादीने शेवटपर्यंत शिवेसनेला साथ दिली हे नाकारता येणार नाही, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं.
राष्ट्रवादीचा ठाकरेंना अल्टिमेटम
शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल, असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उद्धव ठाकरे यांना अल्टिमेटम दिला आहे.
‘उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीबाबतचा महाविकासआघाडीसंदर्भातला निर्णय लवकर जाहीर करावा. आपण लवकर बसून ठरवू. उद्धव ठाकरे जेवढ्या लवकर निर्णय जाहीर करतील तेवढं चांगलं होईल. असही जयंत पाटील म्हणाले.