उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक जगताप कुटुंबियांच्या भेटीला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ जानेवारी । चिंचवड मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असताना भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी अचानक जगताप यांच्या घरी भेटीला आले होते. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फडणवीस हे लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची मनधरणी करण्यासाठी थेट दिल्लीहून कुठलाही दौरा नसताना दाखल झाले.

निवडणूक बिनविरोध करायची असेल तर अश्विनी जगताप यांना उमेदवारी देणे गरजेचे आहे. तसंच अन्य कोणाला उमेदवारी दिली तर इच्छुकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या शंकर जगताप यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे दाखल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *