इराणमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप, 7 ठार : 440 लोक जखमी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ जानेवारी । इराणच्या खोया शहरात शनिवारी रात्री 5.9 तीव्रतेचा भूकंप झाला. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 440 जण जखमी झाले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या 10 किमी खाली होता.इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. स्थानिक माध्यमांनी सांगितले की सरकारी रुग्णालयांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे.

काही भागात बर्फवृष्टी
भूकंपामुळे प्रभावित झालेल्या काही भागात बर्फवृष्टी होत आहे, जेथे तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. काही ठिकाणी वीजपुरवठाही बंद झाला आहे.

जुलै 2022 मध्ये 6.0 रिश्टर स्केलचा भूकंप
2 जुलै 2022 रोजी इराणमध्ये 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के शेजारील देश कतार आणि यूएई तसेच चीनमध्येही जाणवले. या भूकंपात 5 जणांचा मृत्यू तर 44 जण जखमी झाले होते.

25 जूनलाही भूकंप झाला होता
25 जून रोजी इराणच्या दक्षिण प्रांतात 5.6 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. या आपत्तीत एकाचा मृत्यू झाला तर 30 हून अधिक लोक जखमी झाले होते. इराणी प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली होती. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र होर्मोझगान प्रांतातील किश बेटाच्या 22 किमी ईशान्येला होते. त्याचे केंद्र पृष्ठभागापासून 22 किलोमीटर खाली होते.

2003 मध्ये 26 हजार लोकांचा मृत्यू
याआधीही इराणला भूकंपामुळे उद्ध्वस्त होण्याचा सामना करावा लागला आहे. 2003 मध्ये बाम शहरात 6.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या दरम्यान 26000 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *