पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांची यादी लवकरच प्रसिद्ध

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ जानेवारी । पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील फेरीवाल्यांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर 10 दिवस क्षेत्रीय कार्यालयात अर्ज मागविण्यात आले. त्यात एकूण 17 हजार 820 विक्रेते व फेरीवाल्यांची बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या विक्रेत्यांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे आणि हॉकर्स झोन कायद्यामुळे महापालिकेने शहरात फेरीवाल्यांसाठी सर्वेक्षण मोहीम राबविली.

पालिकेने नेमलेल्या एजन्सीच्या मार्फत 1 ते 30 नोव्हेंबर असे सर्वेक्षण करण्यात आले. मुदत संपल्यानंतर सर्वेक्षणास 1 ते 31 डिसेंबर 2022 अशी महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. शासनाच्या अ‍ॅपवर विक्रेत्यांचे विनामूल्य बायोमेट्रिक पद्धतीने ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्यक्ष जागेवर जाऊन विक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात एकूण 17 हजार 437 विक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयात दहा दिवसांत 383 विक्रेत्यांची नोंदणी करण्यात आली. एकूण 17 हजार 820 विक्रेत्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. या संदर्भात भूमि आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी सांगितले की, सध्या प्राप्त अर्जाच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. लवकरच विक्रेत्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *