महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० जानेवारी । काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप समारंभ आज होणार आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून हा प्रवास सुरू झाला होता. ४३० दिवसांनंतर आज श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर यात्रेचा औपचारिक समारोप होणार आहे. राहुल गांधींची ही यात्रा जवळपास 3570 किलोमीटरची होती.
समारोप समारंभाला 21 पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहू शकतात. नुकतेच पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या पक्षांना निमंत्रण दिले होते. याशिवाय चित्रपट निर्माता विशाल भारद्वाज, त्याची पत्नी आणि गायिका रेखा भारद्वाज देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
एक दिवसापूर्वी यात्रा संपली
रविवारी, 29 जानेवारी रोजी राहुल गांधींनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या गाडीत ते तेथे पोहोचले. त्यांच्यासोबत बहीण प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. तिरंगा फडकवल्यानंतर राहुल यांची भारत जोडो यात्रा संपली मात्र 30 जानेवारीला यात्रा संपणार होती. सूत्रांनी दिव्य मराठीला सांगितले की, लाल चौकातील कार्यक्रमानंतर यात्रा संपली असून सोमवारी काँग्रेस कार्यालयात होणारा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.