MHADA Lottery 2023 : म्हाडाचं घर घेतल्यानंतर ते भाड्याने देता येतं का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । : म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीनिघाली आहे. तुम्ही अर्ज भरला का नसेल तर भरला तर तुमच्याकडे अजूनही रजिस्ट्रेशन करून घरासाठी अर्ज करण्याची ही संधी आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत 5 फेब्रुवारी आहे. तर पेमेंट करण्याची मुदत ही 6 फेब्रुवारी आहे. तुम्हाला म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन तिथे रजिस्ट्रर करून अर्ज करू शकता.

यंदाची लॉटरी खूप वेगळी असणार आहे. म्हाडा यावेळी 21 कागदपत्रांऐवजी 7 कागदपत्र जमा करून घेणार आहे. याशिवाय यावेळी संपूर्ण लॉटरी प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसेल असंही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

तुम्हाला जर म्हाडाचं घर गुंतवणूक म्हणून घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट lottery.mhada.gov.in या वेबसाईटवर जाऊन आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर तुम्ही अर्ज भरून पेमेंट करू शकता.

अनेकांना एक प्रश्न असतो की म्हाडाचं घर भाड्याने देता येतं का किंवा विकता येतं का?

समजा तुम्ही अर्ज केला आणि तुम्हाला घर लागलं तर तुम्ही ते घर घेऊ शकता. तुम्हाला जर ते रेंटने द्यायचं असेल तर तेही देता येतं. तुम्हाला त्यासाठी म्हाडाच्या प्राधिकरणाकडून एनओसी घेऊन फ्लॅट भाड्याने देता येऊ शकतो. प्लॅट रेंटने देण्याआधी योग्य ती कागदपत्र जमा करण्यासंदर्भात वकिलांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

या तारखा लक्षात ठेवा

5 फेब्रुवारी – अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

6 फेब्रुवारी- ऑनलाइन पेमेंटचा शेवटचा दिवस

6 फेब्रुवारी- NEFT पेमेंटचा शेवटचा दिवस

13 फेब्रुवारी – ड्राफ्ट अॅप्लिकेशन पब्लिश

15 फेब्रुवारी- फायनल अॅप्लिकेशन

17 फेब्रुवारी – लॉटरी ड्रॉ

20 फेब्रुवारी – रिफंड

म्हाडाची 2 घरं मिळू शकतात? कसा अर्ज करायचा आणि काय आहे नियम पाहा

म्हाडाने मुंबई, पुणे आणि नागपूर जिल्ह्यात लॉटरी काढली आहे. तुम्ही जर म्हाडासाठी अर्ज करत असला तर तुमचा रहिवासी दाखला, उत्पन्न, पॅन कार्ड, आधार कार्ड, 15 वर्ष महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा आणि कोट्यातून घर घेत असाल तर त्यासंबंधित कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *