धुक्यात हरवला पुणे नाशिक महामार्ग ; वाहतूकीवर परिणाम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । जुन्नर तालुक्यातील काही भागांमध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढला असून सर्वत्र सकाळी उशिरापर्यंत दाट धुक्याची दुलई पसरत आहे. याचा परिणाम येथून जाणार्‍या पुणे-नाशिक आणि नगर-कल्याण महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. धुक्यामुळे वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. तर या आल्हाददायक वातावरणात पर्यटक, प्रवाशी तसेच सकाळी फिरावयास येणारे नागरीक, सामान्य जनता मनसोक्त आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.

जुन्नर तालुक्यातून पुणे-नाशिक आणि नगर-कल्याण हे दोन महत्वाचे महामार्ग जातात. सध्या मोठ्या प्रमाणावर पडत असलेल दाट धुके यामुळे या मार्गांवर अपघाताचा धोका वाढला आहे. यापूर्वी काही ठिकाणी धुक्यामुळे छोटे-मोठे अपघात सुद्धा झाले आहेत. सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे वाहन चालकांना रस्ता आणि समोरील वाहने नीट दिसत नसल्याने वाहन चालवितांना अडचणी येतात. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. परिणामी काही ठिकाणी वाहतुक कोंडी होत असल्याचे पहायला मिळते. सोमवारी सकाळी पुणे-अहमदनगर सीमेवरील आळेखिंड येथे वाहने लाईट लावूनच जात होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *