आतंकवादी ज्याप्रमाणे लोकशाहीचा मूल्ये पायदळी तुडवतात त्याप्रमाणे मलाही शिक्षक कधीकधी पायदळी तुडवतात.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । सुनील आढाव । दि . ३० जानेवारी । नुकताच भारताने 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. या दिवसानिमित्त देशाच्या गल्लीबोळ्यात, मोठमोठ्या रस्त्यांवर, मैदानांवर तिरंगा सन्मानाने फडकवला गेला. तिरंग्याला अभिवादन देण्यासाठी वेगवेगळी संचालने झाली. देशासाठी हुतात्मा झालेले शूरवीर यांना या दिवशी मानवंदना देण्यात आली. या सर्व गोष्टींचे व्हिडिओ टीव्हीवर, सोशल मीडियावर दाखवण्यात येत होते. या दिवशी सैनिकांची परेड, मोठमोठ्या नेते मंडळींची भाषणे, देशप्रेमाचे गोडवे, तसेच देशाभिमान जागृत करण्यात येत असतो. मात्र या प्रजासत्ताक दिनाला सर्वांनाच अभिमान वाटेल असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर एका चिमुरड्याचा भाषण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आपले शरीर किंवा मन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काही ना काही तरी उनिवा असतातच. पण त्या गोष्टींवर मात करून आपण आपल्याला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करायचे असते. जालना जिल्ह्यातील रेवलगाव तालुका अंबड येथे राहणारा मुलगा सध्या त्याच्या व्हायरल व्हिडिओ मुळे घरोघरी पोहोचला आहे. या मुलाचे नाव आहे कार्तिक वजीर. कार्तिकला लहानपणापासूनच रातांधळेपणाने ग्रासले आहे. शिवाय घरात हालाखीची परिस्थिती त्यामुळे त्याला अनेक कष्टांना सामोरे जावे लागते. पण परिस्थितींवर मात करून कार्तिक एक हुशार आणि चुनचुनित विद्यार्थी म्हणून शाळेत ओळखला जातो. व्हाट्सअपवरून क्लासमेट बॅच या ग्रुपवरून गौरव जाधव नामक व्यक्तिने हा व्हिडिओ व्हायरल केला होता.

लोकशाही मूल्यांना आतंकवादी पायदळी तुडवात. त्याचप्रमाणे शिक्षकही आपल्याला पायदळी तुडवतात…
कार्तिकचा 26 जानेवारी रोजी भाषण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. त्यात त्यांनी लोकशाहीचे अर्थ सांगणारे भाषण दिले आहे. मात्र हे भाषण त्याने जरा हटके पद्धतीने केले. शाळेतील शिक्षकांच्या शिक्षेचा व आतंकवाद्यांचा संबंध त्याने अर्थपूर्णपणे या भाषणात जोडला. तो म्हणाला की, सर मला आतंकवादी ज्याप्रमाणे लोकशाहीचा मूल्ये पायदळी तुडवतात त्याप्रमाणे मलाही कधीकधी पायदळी तुडवतात. त्याचे हे वाक्य संपूर्ण जगाला पोट धरून हसण्यास भाग पाडत आहे.

विशेष म्हणजे कार्तिक केवळ पहिल्या इयत्तेतच शिकत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण भाषण करावे अशी त्याची इच्छा होती म्हणून त्याच्या शिक्षकांनी त्याच्याकडून भाषण पाठ करून घेतले. मात्र ऐनवेळी त्यांनी उत्तम कल्पनेची सांगड घालत या भाषणात षटकार ठोकून जगाला हसायला लावले व आपला अभिमान वाटेल असे वागून लोकांचे लक्ष वेधून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *