महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३१ जानेवारी । नाशिक । प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे (आयुष्यमान भारत) ई-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढल्यास विविध एक हजार २०९ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रियेचा यात समावेश आहे. (Camp of NMC for Ayushman Bharat Golden Cad nashik news)
पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपये प्रती वर्ष प्रती कुटुंब वैद्यकीय संरक्षण मिळते. या योजने अंतर्गत शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील पात्र लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड तयार केले जाणार आहे. महापालिकेने यापूर्वी आवाहन करूनही पात्र लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड काढलेले नाही त्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये यादी उपलब्ध आहे. यादीमधील पात्र लाभार्थ्यांनी शिधापत्रिका, आधारकार्ड या कागदपत्रांसह महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत अंगीकृत सर्व खासगी रुग्णालये त्याचबरोबर जिल्हा रुग्णालय व महापालिकेचे सर्व रुग्णालय, शहरी आरोग्य प्राथमिक केंद्र या ठिकाणी संपर्क करून गोल्डन कार्ड तयार करून घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
महापालिकेमार्फत योजनेच्या पात्र लाभार्थी यांना गोल्डन कार्ड काढून घेण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांनी शिबिरांमध्ये सहभागी होऊन कुटुंबाचे गोल्डन कार्ड तयार करून घ्यावे असे आवाहन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले.
येथे आहे शिबिर
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, वडाळा गाव प्राथमिक आरोग्य केंद्र, बारा बंगला, जिल्हा रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे रुग्णालय नाशिक रोड, सातपूर मायको, माय