अभिमान शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा उत्साहात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३१ जानेवारी । रवी वाघमारे | पिंपरी चिंचवड । निगडी प्राधिकरणमधील अभिमान इंग्लिश मीडियम स्कूलमधील ज्यूनिअर के.जी ते ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून विविध कलागुण दर्शनाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सुधाकर पाध्ये मा. आयुक्त धर्मादाय संस्था, पुणे (महाराष्ट्र), संस्थेचे अध्यक्ष डॉ. वालचंद संचेती, संस्थेचे सेक्रेटरी बाबुराव जवळेकर, स्कूल कमिटी मेंबर डॉ. इम्तियाज मुल्ला, जे. जी. बोथरा तसेच अभिमान शाळेच्या सर्व मुख्याध्यापिका नांगरे, भोसले व सरोदे मॅडम, तसेच इतर सर्व मान्यवर उपस्थित होते. सरस्वती पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या हेतूने शाळेत विविध स्पर्धा तसेच कार्यक्रम घेतले जातात. यात उत्कृष्ट नैपुण्य मिळवणार्या विद्यार्थ्यांचे कौतुक या प्रसंगी ट्रॉफी देऊन करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषण व मान्यवरांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना व वेलकम गाण्याने विविध पैलुंवर व विषयांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी नृत्याच्या व संगीताच्या जोरावर सुंदर नृत्य प्रदर्शित केले.

यासाठी विद्यार्थी व पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी शाळेचा सर्व परिसर आनंदमयी होऊन गेला. विद्यार्थ्यांचा आनंद, उत्साह व त्यांची लगबग सर्वांचे मन आकर्षून घेत होते. संस्थेचे अध्यक्ष संचेती सरांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले. शाळेच्या प्राचार्या नागरे, मुख्याध्यापिका भोसले व सरोदे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. व कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *