अजिंक्य रहाणे ; बीसीसीआय संघात जागा देत नाही ; ​​म्हणून या देशाच्या संघाकडून खेळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ फेब्रुवारी । भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी आणि दमदार फलंदाज अजिंक्य रहाणे बऱ्याच काळापासून संघापासून दूर आहे. याचा रणजी ट्रॉफीचा सीझन तसा ठीकठाक होता असंच म्हणता येईल. यामुळेच त्याला संघामध्ये पुन्हा स्थान मिळवणे आता कठीण असल्याचे दिसत आहे. अजिंक्य रहाणेने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये भारताकडून शेवटचा खेळला होता. त्यामुळे आता भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने तो दुसऱ्या देशामधून क्रिकेट खेळताना दिसणार आहे. पाहूया नेमका काय प्रकार आहे.

भारताचा हा दमदार फलंदाज आता इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. लीसेस्टरशायरने त्याचा संघात समावेश केला आहे, ज्याची त्यांनी अधिकृत घोषणाही केली आहे. याचसोबत रहाणे लीसेस्टरशायर संघाचे नेतृत्त्व देखील करणार आहे. या क्लबच्या म्हणण्यानुसार, अजिंक्य इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सीझननंतर आठ काऊंटी सामने आणि वन डे चषकाच्या संपूर्ण हंगामासाठी संघाकडून सामने खेळणार आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रहाणेने लीसेस्टरशायर क्रिकेट संघाच्या वेबसाइटवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आगामी हंगामासाठी लीसेस्टरशायरमध्ये सामील होताना मला आनंद होत आहे. मी माझ्या नवीन सहकाऱ्यांसोबत खेळण्यासाठी आणि लीसेस्टर शहराचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहे.

लीसेस्टरशायर संघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘३४ वर्षीय अजिंक्य रहाणेचा संघात समावेश करताना आनंद होत आहे. तो आयपीएल (IPL 2023) नंतर जूनमध्ये संघात सामील होईल. तो LV = इन्शुरन्स काउंटी चॅम्पियनशिप सामन्यांसाठी उपलब्ध असेल आणि एकदिवसीय चषक देखील खेळेल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *