देवगड हापूस APMC मध्ये दाखल, पेटीमागे किती आहेत दर पाहा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३ फेब्रुवारी । आंबा कुणाला आवड नाही असं नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आंबा म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं. हा आंबा खाण्यासाठी अगदी मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागते. मात्र आता ती प्रतीक्षा संपली आहे. कारण आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये दाखल झाली आहे.

वाशीच्या एपीएमसी बाजारात गुरुवारी रत्नागिरी हापूस आंब्याच्या तब्बल 38 पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात तुरळक पेट्या दाखल होत होत्या.गुरुवारी यंदाच्या हंगामातील हापूसची अधिक आवक झाली आहे. बाजारात आंब्याची ही आतापर्यंतची चांगली आवक आहे.
मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये बाजारात दोन डझन हापुसची पाहिली पेटी दाखल झाली होती. त्यावेळी दोन डझनाला 9 हजार रुपयांचा भाव मिळाला होता.
गुरुवारी दाखल झालेल्या हापूसच्या ऐका पेटीतील 4 ते 8 डझनला 5 हजार ते 10 हजार रुपये बाजार भाव मिळाला असून, पिकलेल्या हापूसच्या पेटीला 12 ते 15 हजार रुपयांचा दर मिळाला आहे.

तुम्हाला जर आताच हापूस घ्यायचा असेल किंवा तुमच्या व्हॅलेंटाइनला हापूस आंबा द्यायचा असेल तर तुम्ही आता देऊ शकता. मात्र यंदा हापूस आंब्यासाठी खिसा जरा जास्त रिकामा करावा लागणार असं दिसत आहे. कारण यंदा महागाईमुळे हापूसच्याही किंमती वाढल्या आहेत.तुम्हाला जर हापूसची पेटी घ्यायची असेल तर तुम्ही APMC मार्केटमध्ये येऊन घेऊ शकता. सध्या तिथे 38 पेट्या दाखल झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *