Horoscope Today दि . ५ फेब्रुवारी ; आज या राशीच्या व्यक्तींना दिवस आरामदायी ; पहा बारा राशींचं भविष्य.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ फेब्रुवारी ।

मेष:-
आज सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. कामाची दगदग वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. क्षणिक आनंदाचा लाभ होईल. व्यापारात चांगला लाभ संभवतो.

वृषभ:-
आज मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ होईल. सर्वांना आनंदाने समजून घ्याल. नवीन मित्र जोडाल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात रूजेल. आर्थिक दर्जा सुधारेल.

मिथुन:-
आज गैरसमजाला बळी पडू नका. कलागुणांना चांगला वाव मिळेल. मनाजोगी खरेदी करता येईल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. अति विचार करू नका.

कर्क:-
आज मनाची विशालता दाखवाल. गायन, वादन कलेला चांगला प्रतिसाद मिळेल. शैक्षणिक कामात यश येईल. मनाची सहृदयता दाखवाल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.

सिंह:-
आज अचानक धनलाभ संभवतो. वारसाहक्काची कामे करता येतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

कन्या:-
आज गृहशांती महत्त्वाची आहे. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. पित्तविकार बळावू शकतात. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल.

तूळ:-
आज जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. साहित्याची आवड जोपासता येईल. घरातील कामात व्यग्र राहाल. घरातील स्वच्छता काढली जाईल. मुलांशी जुळवून घ्यावे लागेल.

वृश्चिक:-
आज आवाक्याबाहेर खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक कार्यक्रम काढले जातील. लहान प्रवासाचा आनंद घ्याल. काही कामे खिळून पडतील.

धनू:-
आज पित्ताचा त्रास जाणवेल. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. हातातील अधिकार वापरता येतील. रागावर नियंत्रण ठेवावे.

मकर:-
आज कौटुंबिक खर्चाचा आवाका लक्षात घ्यावा. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. डोळ्याची वेळोवेळी काळजी घ्यावी. गप्पांच्या ओघात जबाबदारी घेऊ नका. हस्त कलेला उठाव मिळेल.

कुंभ:-
आज मनातील अनामिक चिंता दूर साराव्यात. वेळेचे योग्य नियोजन करावे. अडथळ्यातून मार्ग काढावा. हजरजबाबीपणे वागाल. कमिशनच्या कामातून लाभ संभवतो.

मीन:-
आज कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. फसवणुकीपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात पडू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *